मुंबई : यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे. Ajit Pawar
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे.
राज्याच्या महिला धोरणाची तत्काळ अंमलबजावणीबद्दल, कृतीशील उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले.
त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली, तसेच उपमुख्यमंत्री पवार यांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय देऊन गेली.
हे ही वाचा :
महत्वाची बातमी : यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक, ‘असा’ नावाचा असेल अनुक्रम
मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा