Home राज्य Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे...

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

Nilesh Lanke: Sharad Pawar's big statement on MLA Nilesh Lanke's party entry

Nilesh Lanke News : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit pawar) गटाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर मोठे विधान केले आहे. Nilesh lanke

शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांवर होत असलेल्या कारवाई वरून देखील टीका केली. त्यावेळी पत्रकारांनी आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात सामील होणार अशा चर्चा होत्या. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून ते अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत असून शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होण्याची शक्यता आहे.

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगरमध्ये बॅनर्स लागले होते त्यावर लंके यांचा दमदार आमदार-फिक्स खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Exit mobile version