Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

AIKS Nashik : हजारो आदिवासींचे आंदोलन; रस्त्यावरच पेटवल्या चूली

नाशिक : विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांच्या वतीने नाशिक मुंबई लाँग मार्चचे प्रणेते व माजी आमदार कॉ.जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. शेतकरी, कष्टकरी हजारोंच्या संख्येने सोमवारी (ता. २६) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. AIKS Nashik

---Advertisement---

शहरातील स्मार्ट रोडवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. २७) मुंबईत महसूल मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांचा मुक्काम वाढणार आहे. हा मुक्काम अजून किती दिवस वाढेल याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.

जवळपास नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी मोर्चाद्वारे सोमवारी (दि. २६) दुपारी शहरात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा न्यायालयासमोरील स्मार्ट रोडवर या आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समितीने आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी (दि. २७) मुंबईत मंत्रालयात बोलावली होती.

---Advertisement---

बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी आमदार जे. पी. गावित यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी सकाळीच बैठकीकरिता हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. दुपारी १.३० वाजता ही बैठक होणार होती. परंतु विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बैठकीला विलंब झाला होता. सायंकाळी 6.30 ला सुरू झालेली बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. मात्र या बैठकीत शासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन हे सुरुच राहणार असल्याचे जे.पी. गावित यांनी सांगितले.

मेहेर सिग्नल ते सीबीएस दरम्यान या आंदोलकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यावरच ठाण मांडले आहे. त्यामुळे ‘नाशिकच्या स्मार्ट रोडवर’ आंदोलकांनी चूल मांडली आहे. तर उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून थेट मेहेर सिग्नलपर्यंत जाळी टाकून आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिला आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles