प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभा सांगली जिल्ह्याच्या वतीने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे काम नसल्यामुळे महिलांची फायनान्स कंपन्यांंची कर्जे माफ करा, शेतीपंपाची विज बिले माफ करा, घरगुती विज बिले २०० युनिट पर्यंत माफ करा, देवस्थान जमिन इनाम ३ खालसा करा, गायरान अतिक्रमण रहिवासी कायम करा.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड दिगांबर कांबळे, शाहीन मुजावर, संगीता चंदनशिवे, दिलीप शुक्ला, गवस शिरोळकर, अश्विनी सुर्यवंशी आदीसह उपस्थित होते.