Monday, December 23, 2024
Homeकृषीअहमदनगर : खरीप हंगामात खताचा तुडवडा पडू देऊ नका - आमदार किरण...

अहमदनगर : खरीप हंगामात खताचा तुडवडा पडू देऊ नका – आमदार किरण लहामटे

राजुर (अकोले) : अकोले तालुक्यातील राजुर परिसरात खरीप हंगामासाठी खते-बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी मोठी गर्दी करत असल्याने राजुर परिसरात खताचा तुटवडा भासू नये म्हणुन अकोला विधानसभेचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी राजुर येथील किसान ऍग्रो टेक या दुकानाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा कृषि अधीक्षक शिवाजी जगताप यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासू देऊ नका, असे आदेश कृषि विभागाला दिले.

खरीप हंगामात राजुर परिसरात मोठ्या प्रमाणात भात शेती, भाजीपाला लागवड केली जाते.त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताची गरज दरवर्षी लागते.

यावेळी कृषि अधीक्षक शिवाजी जगताप यांनी कुठल्या प्रकारचे खताचा तुटवडा भासू देणार नसल्याचे आश्वासन आमदारांना दिले. 

या उदघाटन प्रसंगी राजूर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळू बोराडे, राष्ट्रवादी पदवीधर संघ तालुका अध्यक्ष सुशील चिखले, सुनिल पंडीत, यशवंत देशमुख, देवेंद्र शेंडे, विकास पवार, संकेत लेंडे, बोगा देशमुख, खडूं विठ्ठल सदगीर, किसान ऍग्रो टेकचे विजय सदगीर, अमोल सांबरे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय