Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणजुन्नर मध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांचे आंदोलन; दगडाला घातला दुधाने अभिषेक

जुन्नर मध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांचे आंदोलन; दगडाला घातला दुधाने अभिषेक

जुन्नर : सध्या राज्यात दूध आंदोलन चांगलेच तापले आहे. राज्यभरात दूध उत्पादक सरकार विरोधात दगडाला दुधाने अभिषेक घालत आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील आंबे आणि माणकेश्वर गावात दगडाला दुधाने अभिषेक घालत सरकार विरोधात आंदोलन केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दूध दरवाढीसाठी जुन्नर तालुक्यातील आंबे आणि माणकेश्वर गावामध्ये दूध उत्पादकांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंबे गावचे सरपंच मुकूंद घोडे, एकनाथ घोडे, सागर घोडे तसेच माणकेश्वर गावात किसान सभेचे तालुका सदस्य कोंडीभाऊ बांबळे, रोहिदास कोरडे धर्मा मुठे, विश्वनाथ शेळकदे, प्रवीण लांडे, सुरेश लांडे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय