सातारा : राज्यातील थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गविविधतेने नटलेल्या महाबळेश्वरची पर्यटनाबरोबरच स्ट्रॉबेरी, केसर, लाल गहू, काळा गहू, निळा भात अशा उत्पादनांमध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आता महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात अक्रोडची शेतीही आता फुलू लागली आहे. प्रत्यक्ष कश्मीरमध्ये अक्रोडची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्याच धर्तीवर महाबळेश्वर कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण करून नव्या प्रयोगाची चाचणी यशस्वी ठरली आहे. महाबळेश्वर, पाचगणी परिसरामध्ये अक्रोडची शेती यशस्वी ठरली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाची कास धरून हे तंत्र शेतात खेळवू लागला आहे. नव्या दमाने शेतात नवीन उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरात केसर निर्मितीनंतर अक्रोडची शेतीही यशस्वी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाच्या अनुभवातून नवनव्या कल्पना महाबळेश्वरचा शेतकरी राबवू लागला आहे. कश्मिरी केसरची जगभरात उत्कृष्ट केसर म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर कश्मीरचा अक्रोडही उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वरातही आता उत्कृष्ट अक्रोड पर्यटकांना चाखायला मिळणार आहेत
मोठी घोषणा : बारावीच्या निकालाची तारिख जाहीर, ‘या’ तारखेला असा पहा निकाल !
खुशखबर ! शेतकऱ्याला ड्रोनसाठी पाच लाखापर्यंत अनुदान