Monday, October 28, 2024
Homeजिल्हाज्ञानवापी नंतर साताऱ्यातील अजलखानाच्या कबरीची सुरक्षा वाढवली !

ज्ञानवापी नंतर साताऱ्यातील अजलखानाच्या कबरीची सुरक्षा वाढवली !

 

सातारावाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मंदिरावरून  सुरू असलेला वाद आणि राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानच्या कबरीजवळ सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

102 बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्स मुंबईचे सहाय्यक कमांडर स्वप्नील पाटील आणि त्यांचे 50 जवान आणि 15 क्यूआरटी जवान अफजल खानच्या कबरीचे रक्षण करत आहेत. तपासणीदरम्यान महाबळेश्वर पोलीस आणि नवी मुंबई जलद कृती दलाचे जवान उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव ही पाहणी करण्यात आली होती आणि त्यानंतर महाबळेश्वरमधील विविध समाजातील मान्यवरांची अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. त्यांनी महाबळेश्वरच्या जनतेला शांततेचे आवाहन करत सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

संबंधित लेख

लोकप्रिय