लखनऊ : काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सिब्बल यांनी उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या मुख्यालयात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केला आहे
Lucknow | I had tendered my resignation from the Congress party on 16th May: Kapil Sibal after filing a nomination for Rajya Sabha elections, with the support of SP pic.twitter.com/yS05HSFWIK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 25, 2022
राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मी आज अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी मी सपा नेते रामगोपाल यादव आणि आझम खान यांचे आभार मानतो. ज्यांनी मला मागील वेळी मदत केली आहे. दरम्यान आता मी काँग्रेसचा नेता राहिलो नाही. १६ मे रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेत कोणत्याही पक्षाशिवाय जनतेसाठी आवाज उठवणार आहे. प्रत्येक अन्यायाविरोधात लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
इस्त्रीवल्याचा जुगाड LPG गॅस वापरून करतोय इस्त्री !
समाजवादी पक्षाकडून सिब्बल यांना मिळालेले हे मोठे बक्षीस मानले जात आहे. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत. संसदेतही त्यांनी आपले मत चांगले मांडले आहे. ते सुप्रीम कोर्टात आझम खान यांचे वकील आहेत. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले तर मला खूप आनंद होईल, असे खान यांनी मंगळवारी आधी सांगितले होते. समाजवादी पक्षाकडून सिब्बल यांना मिळालेले हे मोठे बक्षीस मानले जात आहे.
भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या ?