Amrita Pandey : भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा शनिवारी संध्याकाळी भागलपूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या घटनेमुळे भोजपुरी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा शनिवारी संध्याकाळी उशिरा भागलपूरमधील आदमपूर जहाज घाट येथे असलेल्या दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा एफएसएलमार्फत तपास केला आहे. अमृता पांडे हिला ‘अन्नपूर्णा’ या नावाने ओळखले जायचे. अमृता पांडेच्या (Amrita Pandey) निधनाची माहिती समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून तिच्या गळ्यातील फास आवळण्यासाठी वापरलेली साडी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दिवंगत अमृता पांडे यांनी भोजपुरी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले होते. संशयास्पद परिस्थितीत तिचा मृत्यू होण्यापूर्वी भोजपुरी अभिनेत्रीने व्हॉट्सॲपवर एक हृदयद्रावक स्टेटस पोस्ट केले होते.
Amrita Pandey व्हॉट्सॲप स्टेटस
आत्महत्येपूर्वी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेने एक संशयास्पद स्टेट्स ठेवलं होतं. तिने व्हॉट्सॲप स्टेटसवर लिहिले होते की, ‘त्याचे आयुष्य दोन बोटींवर आहे, आम्ही आमची बोट बुडवून त्यांचा मार्ग सोपा केला.’ या स्टेटसच्या काही वेळातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यामुळं अमृतासोबत नक्की काय घडलं याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
दरम्यान, 2022 मध्ये बिलासपूर, छत्तीसगड येथील चंद्रमणी झांगडशी ती लग्नबंधनात अडकली होती. तिचा नवरा मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर आहे.
हे ही वाचा :
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार
मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ
ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक
मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता
रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती