Friday, May 3, 2024
Homeबॉलिवूडअभिनेता सलमान खानला पुन्हा पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे सलमान खानचे ‘मूसेवाला सारखे करणार’ असे म्हटले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान जॉगिंगसाठी गेले होते, यावेळी ते विश्रांती घेण्यासाठी बाकावर बसला असताना त्यांना त्यांच्या आणि सलमानच्या नावाने धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात “मूसेवाला सारखे करू” असे म्हटले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस बँडस्टँड परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि बाकावर हे पत्र कोणी टाकले याबाबत स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

अरब देशात मोदी चक्क कचराकुंडीवर ; काँग्रेस नेत्यांचा संताप !

दरम्यान, 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मूसवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे, त्यानेच या अगोदर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मूसवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.  मूसवालाच्या हत्येला आता एक आठवडा होत आहे, मात्र पोलिसांनी सिद्धूच्या मारेकऱ्याला पकडलेले नाही.

काळवीट प्रकरणी सलमान खानचे नाव समोर आल्यानंतर लॉरेन्सने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वास्तविक, बिश्नोई समाजात काळ्या हरणाला पवित्र मानले जाते. याच कारणामुळे गुंडाने सलमानला मारण्याची घोषणा केली होती. 2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्सने जोधपूरमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय