Friday, May 3, 2024
Homeबॉलिवूडब्रेकिंग : अभिनेते किरण माने यांची राजकारणात एंट्री, या पक्षात करणार प्रवेश

ब्रेकिंग : अभिनेते किरण माने यांची राजकारणात एंट्री, या पक्षात करणार प्रवेश

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अनेक सेलिब्रिटींनी राजकारणामध्ये एन्ट्री केली. आता प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने आज राजकारणात प्रवेश करणार आहेत.

अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि सिनेसृष्टीतील मुद्द्यांवर ते भाष्य करत असतात. त्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे ते नेहमीच चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) आणि ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेच्या माध्यमातून  किरण माने घराघरांत पोहोचले. अशात आता किरण माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजप विरोधात भूमिका घेत असल्याने आपल्याला एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीतून काढल्याचा माने यांनी आरोप केला होता. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय