Dilip Walse Patil : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil Accident) यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. काल संध्याकाळी आपल्या राहत्या घरातच पाय घसरून पडले आहेत. यात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil Accident) काल रात्री त्यांच्या राहत्या घरात पाय घसरून पडले. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या वळसे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहले आहे की, ‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.’
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil Accident) यांना दुखापत झाल्याने महायुती समोरील टेन्शन आता वाढले आहे. आढळराव पाटील यांना लोकसभेवर पाठविण्यासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवार गटाने मोठी जबाबदारी सोपवली होती.
हे ही वाचा :
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ