पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:’आप’चे सचिव स्वप्नील जेवळे ह्यांनी पालिकेला गेल्या वर्षी जळीत कक्ष (Burn Ward) सुरू करण्यासंबंधीची मागणीचे पत्र दिले होते.शेकडो जळीत रूग्णांच्या बलिदानानंतर अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच सुसज्ज जळीत कक्ष स्थापन करणार आहे.तब्बल 1 वर्षांनी ही मागणी मान्य झाली आहे.
आत्ताच तळवडे येथील फटाक्यांच्या लागलेल्या आगीत सुमारे 14 स्त्रियांच्या बलिदानानंतर अखेर चिंचवड महानगरपालिकेला जाग आली आणि चिंचवड महानगरपालिकेने जळीतग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जळीत कक्ष स्थापन करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे,स्वप्नील जेवळे ह्यांनी प्रश्न उपस्थित केला की,नागरिकांचा बळी घेतल्याशिवाय पालिकेकडून सामान्य नागरिकांना कोणतीही सुविधा मिळणार नाही का?
महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जळीत कक्षांच्या प्राथमिक खाटांची क्षमता 15 ते 30 असण्याची शक्यता आहे, ती वाढवून 50 करावी,अशी मागणी स्वप्निल जेवळे यांनी केली आहे.