Thursday, December 26, 2024
Homeकृषीनागपूर येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांंविरोधात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

नागपूर येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांंविरोधात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

नागपूर : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांंविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने आज (दि. ३) नागपूर येथील संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आले.

पंजाब, हरियाणा आणि देशातील विविध शेतकरी संघटना मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. त्यांच्या समर्थनार्थ आपच्या वतीने निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र आणि देश्यातील विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार विरोधात देशव्यापी समर्थन करण्याकरिता एल्गार पुकारलेला आहे. दिल्लीच्या राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी कायदा रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या आंदोलनात आम आदमी पार्टीने पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याचे म्हटले आहे. 

आंदोलनात राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय समिती सदस्य अमरीश सावरकर, कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, शंकर इंगोले, प्रशांत निलाटकर, स्वीटी इंदुरकर, दिपाली पाटील, हेमंत दिवाने, जयप्रकाश पवनीकर आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय