Thursday, December 5, 2024
Homeराजकारणआम आदमी पक्षातर्फे नागपूर येथे 'संविधान दिवस' साजरा !

आम आदमी पक्षातर्फे नागपूर येथे ‘संविधान दिवस’ साजरा !

नागपूर : आज संविधान चौक येथे आम आदमी पक्षाच्या वतीने ‘संविधान दिवस’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून साजरा करण्यात आला. सोबतच आप’चा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

संविधान सभेच्या प्रारूप समिती चे अध्यक्ष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १२५ व्या जयंती च्या रूपाने २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान दिवस आजच्या दिवशी साजरा करण्यात येतो. संविधान सभेने भारताचे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवसात पूर्ण तयार करून २६ नोव्हेबर १९४९ ला देश्याला समर्पित केला आणि त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली.

याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी आजच्या दिवशी मोठया प्रमाणात संविधान दिवस साजरा करण्यात येतो. 

यावेळी संविधान चौक येथे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, कविता सिंघल, नेशनल काउंसिल सदस्य अमरीश सावरकर, शंकर इंगोले, प्रशांत निलाटकर, गीता कुहीकर, संजय सींग, हरीश गुरबानी, प्रतीक बावनकत, शशिकांत रायपुरे, गुल्लू बेहरा, मौदेडकर, राजेश भोयर, अलमडोहकर जी, अलका पोपटकर उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय