नवी दिल्ली;आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. विशेषत: अशा लोकांना आधार अपडेट करण्यास सांगितले जात आहे,ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले होते आणि त्यानंतर ते कधीही अपडेट केलेले नाही.मात्र, आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक नाही.पण जर तुम्ही त्यात आवश्यक अपडेट्स केले नाहीत तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शासकीय योजना,महाविद्यालय,शाळा प्रवेश ,नोकरभरती,मोबाईल सिम खरेदी,बँक अकाउंट खोलणे,वैयक्तिक,गृहकर्ज,आदी विविध ठिकाणी आधारकार्ड मागितले जाते.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधार मोफत अपडेट करण्याची मुदत १४ डिसेंबर रोजी संपणार होती.मात्र त्यापूर्वीच आज (मंगळवार) सरकारकडून याची मुदत पुन्हा तीन महिन्यांनी वाढवून १४ मार्च २०२४ करण्यात आली आहे.सरकारने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आता पुढील वर्षी १४ मार्चपर्यंत आधार कार्डमध्ये मोफत अपडेट करता येईल.
प्राधिकरणाने सांगितले की,नागरिकांकडून आधार अपडेटसाठी मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. आधार अपडेशनची डेडलाइन तीन महिन्यांनी वाढवली आहे.आता माय आधार पोर्टलच्या माध्यमातून विनाशुल्क १४ मार्च २०२४ पर्यंत आधार अपडेट केले जाऊ शकते.प्राधिकरणाने म्हटले की,अखेरची तारीख १५ डिसेंबर २०२३ ते पुढच्या तीन महिन्यांसाठी म्हणजे १४ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
असे करा अधारकार्ड अपडेट
तुम्ही UIDAI साइट, आधार केंद्र आणि myaadhaar मोबाइल अॅपला भेट देऊन आधार कार्ड अपडेट करू शकता. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे…सर्व प्रथम
https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
-लॉगिन करा आणि नाव,लिंग,जन्मतारीख आणि पत्ता अपडेट यासारखे तुमचे तपशील सत्यापित करा.यानंतर तुम्ही ‘अपडेट आधार ऑनलाइन’वर क्लिक करा.पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत सबमिट करा.
यानंतर तुमच्याकडे 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट होईल.तुमच्या आधारावरील माहिती अपडेट करताना, पीव्हीसी कार्ड बाबत माहिती मिळवण्यासाठी किंवा एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही युआयडीएआयच्या टोल-फ्री नंबर १९४७ वर कधीही कॉल करू शकता.