Friday, December 27, 2024
Homeजिल्हाकामगार दिनानिमित्त राज्यव्यापी उपवास, कामगारांच्या मागण्याकडे लक्ष वेधले

कामगार दिनानिमित्त राज्यव्यापी उपवास, कामगारांच्या मागण्याकडे लक्ष वेधले

पिंपरी :  कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमीत्त  सुर्योदय ते सुर्यास्त एक उपवास कृतज्ञतेचा, जबाबदारीचा हा राज्यव्यापी उपवासात शहरातील कष्टकरी वर्ग आपल्या विविध मागण्यांसाठी शंभर ठिकाणाहून सहभागी झाले. राज्यात सर्व जिल्ह्यात हा उपक्रम झाला.

जन आंदोलनाची संघर्ष समिती, नॅशनल हॉकर फेडरेशन, वर्किंग पीपल चार्टर, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांनी यात  सक्रिय सहभाग नोंदवला. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, संजू साळुंखे तुकाराम माने, ओमप्रकाश मोरया, राजेश माने, अशोक कांबळे, अर्चना कांबळे, पौर्णिमा शिंदे, सुनिता रमोले, वंदना कारंडे, राजू बोराडे, उमेश डोर्ले, सूरज दशमाने व अन्य सहभागी झाले.

महासंघाने दिलेल्या पत्रकात नमुद केले की सर्वजन  एका अभूतपूर्व करोना नामक आपत्तीला सामोरे तर जात आहोत. याचा सर्वात जास्त फटका कष्टकरी वर्गावर झाला आहे. सध्या परिस्थीती गंभीर असून कष्टकरी वर्गाला मोफत लसिकरण आणि मोफत रेशन, स्थलांतरित कामगार यांचे वेतन मिलाले पाहिजे, लाखो कुटुंबांकडे रेशनकार्ड देखील नाही. शासन  पावले उचलत आहे. मात्र फक्त अधार कार्डावर रेशन द्यावे, फक्त अन्न सुरक्षा कार्डधारकांना मोफत धान्य दिले जाणार आहे. पण रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची अवस्था भीषण आहे. याचाही विचार व्हावा, असेही म्हटले आहे.

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत, यासाठी महाराष्ट्रात आणि देशात जो संघर्ष चालू आहे. यापुढेही संघर्ष सुरूच राहणार, मात्र कष्टकरी वर्गाला हिताचे कायदे बनवण्यात येत गरजेचे आहे. आणि सध्याच्या कोरोना कालावधीमध्ये श्रमिक कष्टकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक सहाय्य करावे, असेही काशिनाथ नखाते यांनी नमूद केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय