Wednesday, December 4, 2024
HomeआंबेगावTribal Development : आदिवासी विकास मंत्री व सहकार मंत्री यांच्या सोबत SFI...

Tribal Development : आदिवासी विकास मंत्री व सहकार मंत्री यांच्या सोबत SFI च्या शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक संपन्न

मुंबई : घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वसतिगृह आणि आश्रमशाळेच्या विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले. आदिवासी विकास मंत्री यांच्या सोबत बैठक आणि प्रकल्प अधिकारी व शिष्टमंडळ यांची ७ तास झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमहोदयांच्या दालनात एसएफआयचे शिष्टमंडळ तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांची बैठक दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली. (Tribal Development)

या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त, नाशिक मा. नयना गुंडे, टीआरटीआयचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. आकाश शिंदे व प्रकल्प प्रशासनाचे प्रतिनिधी मा. विपुल टकले, मा. पिलाजी लांडे हे अधिकारी उपस्थित होते. तर एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा सहसचिव समीर गारे, निशा साबळे, राजू शेळके हे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सहकार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांच्या सोबतही शिष्टमंडळाने चर्चा केली. मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मा. दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

यावेळी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. सर्व शिष्यवृत्तीधारक आदिवासी विद्यार्थ्यांना शून्य(०) रुपयांत प्रवेश देण्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल. MS-CIT, Tally, टायपिंग प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येईल. पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पुणे येथील कोरेगाव पार्क येथे २००० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. जिल्हास्तरावरील वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून पूर्वीप्रमाणे मेस पद्धत सुरू करण्याबाबत सरकारात्मक असल्याचेही मंत्रीमहोदयांनी नमूद केले. (Tribal Development)

परंतु सेंट्रल किचन बंद विषयी ठोस निर्णय होवू शकला नाही. वसतिगृहांच्या जागा कायमस्वरूपी वाढवण्याच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या दोन मुद्द्यांचा योग्य विचार शासनाने करावा. तसेच मान्य केलेल्या मागण्यांची लवकरत लवकर अंमलबजावणी न झाल्यास नाशिकच्या आयुक्तालयावर एसएफआय तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विनेश फोगाटच्या अपात्रतेवर राहुल गांधी यांचे ट्वीट

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

विनेश फोगाटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले वाचा !

BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या

बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

संबंधित लेख

लोकप्रिय