Pandharpur : पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसेनगर अंगणवाडीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडी शाळेतील पोषण आहारामध्ये बेडकाचे मृत पिल्लू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रशासनाच्या व्यवस्थेवर जोरदार टीका होत असून, पालक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसेनगर अंगणवाडीत मुलांना पोषण आहार वाटप करत असताना पोषण आहाराच्या पातेल्यामध्ये बेडकाचे मृत पिल्लू आढळले. ही घटना समजताच अंगणवाडीत एकच गोंधळ उडाला. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या गंभीर घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि रागाची भावना निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडूनही घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Pandharpur)
या घटनेनंतर पालकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलांच्या पोषण आहारामध्ये असा किळसवाणा प्रकार घडल्यामुळे त्यांच्या आरोग्याची गंभीर जोखीम निर्माण झाली आहे. प्रशासनाने या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, मुलांच्या पोषण आहारामध्ये एखादा प्राणी आढळण्याची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील विद्यापीठाच्या होस्टेलच्या मेसमध्ये चटणीत जिवंत उंदीर सापडल्याची घटना समोर आली होती. या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय पोषण आहार योजनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाली आहे. पंढरपूरच्या अंगणवाडीतील या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!