Thursday, December 26, 2024
Homeताज्या बातम्याJNU : 'जेएनयू' विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न...

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

JNU SU Election 2024 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांनी जोरदार मुसंडी मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) व भारतीय जनता पार्टी (BJP) संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) चा दारूण पराभव केला आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विजयानंतर रविवारी रात्री ‘जेएनयू’मध्ये जल्लोषाचे वातावरण होते. ‘जय भीम’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले होते.

कोरोना महामारी नंतर तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सह-महासचिव ही चारही पदे डाव्या आघाडीने जिंकली आहेत. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या आघाडीमध्ये ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (आयसा), डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन (डीएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) यांचा चार संघटनांचा समावेश होता.

या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चा उमेदवार धनंजय यानं 2598 मते मिळवून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्याचा प्रतिस्पर्धी अभाविपचा उमेश सी अजमीरा याला केवळ 1676 मते मिळाली. तर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा (SFI) अविजित घोष यांनं अभाविपच्या दीपिका शर्माचा पराभव करून उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.

तर ‘बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन’च्या (BAPSA) प्रियांशी आर्य यांनी डाव्या आघाडीच्या मदतीने महासचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. प्रियांशी आर्य यांनी 2887 मिळवत ‘अभाविप’च्या अर्जुन आनंद यांचा 926 मतांनी पराभव केला. डाव्या संघटनांच्या उमेदवार स्वाती सिंह हिचा अर्ज निवडणूक समितीने रद्द केल्यानंतर डाव्या संघटनांनी प्रियांशी आर्य हिला पाठिंबा दर्शवला होता.

तर संयुक्त सचिवपदी डाव्या संघटनांचा उमेदवार मोहम्मद साजिद निवडून आला. त्यानं अभाविपच्या गोविंदचा पराभव करून विजय मिळवला.

‘अभाविप’ने 2000 मध्ये फक्त एकदाच अध्यक्षपद काबीज केले होते. त्यानंतर 24 वर्षांनंतरही त्यांना अध्यक्षपद मिळू शकले नाही. 20215-16 मध्ये ‘अभाविप’ला सह-महासचिवपद जिंकता आले होते. त्यानंतर डाव्यांच्या ऐक्यामुळे उजव्या विचारांच्या या संघटनेला चारपैकी एकही महत्त्वाचे पद मिळवता आले नाही. 2019 मध्ये ‘एसएफआय’च्या आयशी घोषने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती.

12 वर्षांत झालेल्या निवडणुकांमधील विक्रमी मतदान

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) निवडणुकीत शुक्रवारी 73 टक्के मतदान झालं. गेल्या 12 वर्षांत झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान होतं. दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत 7700 हून अधिक नोंदणीकृत मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी विविध अभ्यास केंद्रांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होते.

कोण आहे जेएनयू (JNU) चा नवा अध्यक्ष

अध्यक्षपदासाठी डाव्यांचे विजयी उमेदवार धनंजय स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्सचे पीएचडीचे विद्यार्थी आहेत. धनंजय गया हा बिहारचा रहिवासी असून तो दलित समाजातील आहे. त्याचे वडील निवृत्त पोलीस आहेत. तो आयसा (AISA) या विद्यार्थी संघटनेशी संबंधीत आहे.

कोण कोणत्या संघटनेशी संबंधित ?

विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव या पदांसाठी शुक्रवारी मतदान झाले, त्यापैकी तीन डाव्या संघटनांनी तर एक जागा बाप्साने जिंकली. जेएनयूचे नवे अध्यक्ष धनंजय हे (आइसा), उपाध्यक्ष अविजित घोष हे (एसएफआय), प्रियांशी आर्य (बाप्सा) तर मोहम्मद साजिद हे (एआईएसएफ) या विद्यार्थी संघटनांशी संबंधीत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

संबंधित लेख

लोकप्रिय