Junnar : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून देशभरात पोलिस प्रशासन अलर्ट वर आहे. अशातच आता जुन्नर (Junnar) तालुक्यातील आळेफाटा हे पुणे – नगर हद्दीवरील शहर असून आळेफाटा पोलिस सतर्क झाले आहे. आळेफाटा पोलिसांकडून हद्दीवर नाकाबंदी केली जात आहे.
पोलिसांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आळेखिंड पुणे व अहमदनगर जिल्ह्याची सरहद्द असल्याने यामार्गे अवैध दारू, अवैध पैसे इत्यादी जाण्याची दाट शक्यता असल्याने ही नाकाबंदी करण्यात येत आहे.
महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे अशी माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीष होडगर यांनी दिली. (Junnar)


हे ही वाचा :
ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर
जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल