जुन्नर (रफिक शेख): रमजान महिन्याची सुरूवात दोन दिवसांत होत आहे. या पार्श्वभुमीवर सोमवार मुस्लिम समाज बांधवांची जुन्नर (Junnar) पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर ही बैठक आयोजित केली होती. Junnar
पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या समजून घेत जुन्नर शहरात सामाजिक सलोखा कसा कायम राहील याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, जुन्नर शहरातील सदाबाजार पेठ ते जुन्नर नगरपरिषद या ठिकाणी सायंकाळी उपास सोडण्यासाठी दुकाने लागत आहे, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. या निमित्ताने या परिसरातील दुकानाचे नियोजन जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अधिकारी करणार आहेत.
दरम्यान, या बैठकीसाठी जुन्नर शहराचे माजी नगरसेवक ऍड. जमीर भाई कागदी, रउफ खान, सईड पटेल, रउफ इनामदार, युसुफ भाई याकूब शेख, इसहाक कागदी, मजहर तिरंदाज आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा