Thursday, December 5, 2024
Homeराजकारणजितेंद्र आव्हाड यांचे विरोधकांना खडेबोल "महाराष्ट्रधर्म पाळा"

जितेंद्र आव्हाड यांचे विरोधकांना खडेबोल “महाराष्ट्रधर्म पाळा”

(प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या वरून सध्या राज्यात राजकारण सुरु आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड विरोधकांवर चांगलेच संतापले आहे.

     दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. असं म्हणत त्यांनी गुजरातचा मृत्युदर सांगा की! असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

        यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करून गुजरात आणि महाराष्ट्राचा मृत्युदर सांगत महाराष्ट्रधर्म पाळा असे खडेबोल सुनावले आहे. त्यांनी यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, कोविड-19 गुजरातचा मृत्युदर 6.25% आहे तर महाराष्ट्राचा मृत्युदर 3.73% आहे असे म्हणत, “महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो , जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना ‘महाराष्ट्र पॅटर्न’ काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा.” असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना सुनावले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय