Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील महानगर पालिकेच्या एका शाळेत शालेय पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष आढळले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. Akola School Students Food Poisoning

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला महापालिकेच्या शाळा क्रमांक 26 शिवसेना वसाहत इथं मंगळवारी दुपारी शालेय पोषण देण्यात आला. मात्र या आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्यावर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. 9 ते 10 वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत.

राज्यात जवळपास सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. अनेकदा हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विषबाधेच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेतच हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे.

---Advertisement---

या प्रकरणाचा पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तसेच पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभागावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दरम्यान, हिंगोलीत काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून १५० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. अशातच आता अकोल्यातही शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles