Sunday, December 22, 2024
Homeताज्या बातम्याचित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले अक्षय कुमार-टायगर श्रॉफ, कार्यक्रमात लोकांनी फेकले बूट आणि चप्पल

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले अक्षय कुमार-टायगर श्रॉफ, कार्यक्रमात लोकांनी फेकले बूट आणि चप्पल

लखनऊ : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या लखनऊमधील एका कार्यक्रमात लोकांनी बूट आणि चप्पल फेकल्याची व्हिडिओ समोर आली आहे. सध्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मात्र या प्रमोशन दरम्यान लोकांनी बूट आणि चप्पल फेकल्याचा व्हिडिओ समोर आला आहेत.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दोघेही जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन ते सध्या करत आहेत. चाहत्यांना माहिती मिळताच या कार्यक्रमासाठी अर्ध्या तासात मोठ्या संख्येने चाहते जमा झाले.

काहींनी अक्षयला गाण्याची विनंतीही केली होती. अभिनेत्याने लोकांना शांत राहण्याचे आवाहनही केले होते. पण काही वेळातच गर्दी इतकी वाढली की धक्काबुक्की सुरू झाली. मागणी पूर्ण न झाल्याने लोकांनी मंचावर बूट आणि चप्पल फेकण्यास सुरुवात केली. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. अन्यथा चांगरचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असती.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर दोन्ही कलाकार कार्यक्रम संपण्यापूर्वीच तेथून निघून गेले.

हेही वाचा :

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

संबंधित लेख

लोकप्रिय