Thursday, December 5, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य, कविता; कोरोना - तुषार गुळीग

जनभूमी साहित्य, कविता; कोरोना – तुषार गुळीग

कविता –  कोरोना

नैसर्गिक आपत्ती असो वा संकट

आम्ही धावा करतो तुझा,

नवसाला आमच्या पावणारा

तो आज देव कुठे गेला?

बदलत राहील सर्व काही

त्यात हस्तक्षेप नाही कुणाचा,

संकटाला आमच्या धावणारा

तो आज देव कुठे गेला?

दाखवण्यासाठी देवा नाही तुझे मंदिर

उभारण्यात कष्ट गेले आमचे वाया,

मग माणसाच्या मदतीला तु कधी येणार

तो आज देव कुठे गेला?

दवाखाण्यासाठी नाही तर मंदिर

उभारण्यासाठी इथे  डोकी फुटतात एकमेकांची,

मग माणसातच देव आहे सांगणारा

तो आज देव कुठे गेला?

तुलाही एकटं राहावं लागलं

कोण बांधिल नाही वेळेचा,

स्वप्नातही काही दृष्टांत देणारा

तो आज देव कुठे गेला?

विज्ञानाच्याही युगात देवा

सारे करतात धावा तुझा ,

संकटातही मार्ग दाखवणारा

तो आज देव कुठे गेला?

– तुषार पोपट गुळीग

  7219728293

(गाव- गौडवाडी, ता. सांगोला, जिल्हा-सोलापूर)

संबंधित लेख

लोकप्रिय