Thursday, December 5, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य: लेख : तुकाराम मुंढे एक सच्चा अधिकारी - विठ्ठलराव वठारे

जनभूमी साहित्य: लेख : तुकाराम मुंढे एक सच्चा अधिकारी – विठ्ठलराव वठारे

   

                             लेख

            तुकाराम मुंढे एक सच्चा अधिकारी

     नागपूर येेथील कवीवर्य सुरेश भट हॉल समोर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या समर्थनात नागरिकांच्या वतीने दि.२० जन रोजी जोरदार आक्रोश प्रदर्शन केले गेले हीच घटना त्यांच्या शिस्तबद्ध,जनतेच्या प्रती दक्ष आणि संविधानप्रती प्रामाणिकतेची साक्ष देते. नवी मुंबई, पुणे,नाशिक पाठोपाठ आदरणीय तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ जनता एकजूट राहून रस्त्यावर उतरते याचा स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवन घेणा-या़ंनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

      मुंढेंची एक व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारी ही दोन्ही रुपे आम्हाला चांगली ज्ञात आहेत.त्यांची कार्यशैली आम्ही जवळून पाहिली असल्याने त्यांनी बेधडकपणे काम केले असेल, तर ते काम बेकायदेशीर असूच शकत नाही हा आमचा स्पष्ट दावा आहे. केलेल्या कामाची  आकडेवारीनुसार खडानखडा माहिती ठेवणारे अभ्यासू आणि स्वाभिमानी आयुक्त महानगर पालिका पदाधिकाऱ्यांच्या आम सभेतून सभा सोडून निघून जातात, यावरून पदाधिका-यांचा मुजोरपणा उघड होतो. लोकप्रतिनिधि म्हणन जो मान आणि सभ्यता अपेक्षित असते तीच अपेक्षा शासकीय अधिका-यांची ही असते हे कुठल्याही पुढाऱ्यांनी  विसरता कामा नये. निवड झाल्यानंतर निष्पक्ष आणि पारदर्शक कारभार करण्याची शपथ घेऊन मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात तसा कारभार राबविण्यात येताना संबंधित अधिकारी हा त्यांना जाचक ठरू लागतो. ‘आवश्यक तिथे आणि आवश्यक तेवढाच निधी’ या तत्त्वानुसार आयुक्तांच्या कामाची पद्धतच लोकप्रतिनिधींना जाचक ठरत आहे.कारण सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांना पारदर्शक कारभाराचे वावडे असते हे कटू असले तरी ते सत्य आहे.

      ‘पाचही बोटं एकसारखी नसतात हे जरी खरं असलं तरी खाताना ती एकत्र होतात हे देखील एक वास्तव आहे.’ खरं तर एका शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे आणि गैरवर्तणूक करणे या गोष्टी लोकप्रतिनिधींचे निलंबन करण्याजोगे आहेत .

      मुंढें जिथे जिथे कार्यरत होते तिथल्या नागरिकांप्रमाणे नागपूर ची जनताही तुकाराम मुंढें च्या समर्थनात आहे हा संदेश जाणे हे सज्ञ नागरिकांच्या जेवढे हिताचे आहे तितकेच गरजेचे होते आणि ते गेले ही. जनता एका इमानदार व कार्यक्षम अधिकाऱ्याच्या कामाची कदर करते व त्यांच्या समर्थानात रस्त्यावर येऊ शकते हा संदेश राजकीय वर्गाला नक्कीच गेला आहे.

     मागील काही दिवसांत मनपा आयुक्त तुकाराम मुंढें यांनी महानगर पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस केला आहे. हा भ्रष्टाचार कचरा कलेक्शन आणि डम्पिंगचा असो किंवा तो नागनदी सफाईचा असो, मनपा आयुक्तांनी आपली नेहमीची उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून काम केले आहे. इतर महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा सुळसुळाट असताना नागपूरात मात्र त्यांनी स्थितीवर पर्ण पणे नियंत्रण राखून आपल्या कार्यक्षमतेची जाणीव करून दिली आहे. म्हणन तर जाईल तिथे जनता आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या कामाला सलाम करते आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.इतकेच.

विठ्ठलराव वठारे

अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच सोलापूर.

संबंधित लेख

लोकप्रिय