प्रतिनिधी : पावसाळा सुरू झाला, पर्यटनाला सुरूवात होत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असली तरी अंतर राखून पर्यटनाला अनेक जण जात आहे. जिल्हा पातळीवर पर्यटनस्थळी जात असताना काळजी घेणे गरजेची आहे.
धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणी जात असताना नियमांचे पालन करावे, व खालील बाबी टाळाव्यात.
◆ पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
◆ धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
◆ पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
◆पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
◆वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
◆ वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
◆ सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
◆ सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
◆ सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, ङिजे. सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
◆ ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
◆धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत असते (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून).