Thursday, December 5, 2024
Homeपर्यटनस्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे-पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे-पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश



औरंगाबाद:-(प्रतिनिधी) प्रियदर्शनी उद्यान एम.जी.एम एन-६ परिसरात होणारे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिके अंतर्गत विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.


     यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की,प्रियदर्शनी उद्यान एम. जी.एम एन-६ परिसरात स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाच्या कामासंदर्भात  येणाऱ्या तांत्रिक अडचणी विनाविलंब दूर करून काम तातडीने पूर्ण करावे.तसेच मुख्यमंत्री शहरी सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या स्वनिधीतून रस्त्याची कामे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यासंदर्भात एका आठवड्यात कामाची निविदा काढणार असल्याची माहितीही यावेळी देसाई यांनी दिली.

       यावेळी अधिकाऱ्यांनी विविध विकास कामासंबंधीत माहिती दिली. या बैठकीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय सिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय