Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणलॉकडाऊन काळातील घरगुती विज बिले माफ करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी.

लॉकडाऊन काळातील घरगुती विज बिले माफ करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी.

नाशिक (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील भरमसाठ आलेल्या वीज बिलाची तपासणी करा, तसेच लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी करा या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

माकपने म्हटले आहे की, केंद्रातील सरकारने २४ मार्च पासून लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व उद्योग, व्यवसाय, व्यापार, दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे कामगार, कष्टकरी, असंघटित कामगार, दुकानदार, व्यापारी व्यावसायिक, लघुउद्योजक उद्योजक या सर्वांचे उत्पन्न बंद झाले. उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने ३ महिन्याची वीज बिले एकत्रितपणे दिली. ही बिले नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त आहेत. त्यामुळे त्या वीजबिलाची तपासणी करण्यात यावी व यापूर्वी आलेल्या सरासरीच्या बिलानुसार आकारणी करावी.

तसेच लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला, उत्पन्न बंद झाले. अजूनही अनेक व्यवसाय, उद्योग सुरू झालेले नाहीत. हजार लोकांना अजूनही काम मिळत नाही व त्यांचे उत्पन्न बंद आहे. त्यामुळे लोक वीज बिल भरू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एप्रिलपासूनचे घरगुती विज बिल माफ करण्यात यावे, लघु व मध्यम उद्योगांना व व्यवसायिकांना विज बिलामध्ये सवलत देण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी माकपचे शहर सेक्रेटरी ऍड.वसुधा कराड, राज्य कमिटी सदस्य, सिताराम ठोंबरे, ऍड.तानाजी जायभावे, सिंधू शार्दुल, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, संतोष काकडे, मोहन जाधव भागवत डुंबरे, पाशाखान पठाण उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय