Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणसार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा 'या' गावाने घेतला निर्णय.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा ‘या’ गावाने घेतला निर्णय.

कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगनूर (कापशी) या गावाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करणारे हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

अनेक वर्षांच्या परंपरेला फाटा देत, तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लिंगनूर (का.) या गावातील आठ गणेशोत्सव तरुण मंडळांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी तरूण मंडळांंच्या पदाधिकाऱ्यांनी मुरगूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे यांना पत्रकाद्वारे कळवले आहे.

मुरगूड पोलीस स्टेशनने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा ऐतिहासिक निर्णय घेऊन इतर गावांसमोर आदर्श ठेवल्याबद्दल सर्व लिंगनूर ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळांचे आभार. सध्या कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनेक वर्षांच्या परंपरेला फाटा देत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा न करता सामाजिक कार्यक्रम राबवत यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप, हँडवॉश वाटप, वृक्षारोपण सारखे सामाजिक कार्यक्रम शारीरिक अंतर ठेऊन करु असे सांगितले आहे.

किशोरकुमार खाडेपोलीस उपनिरीक्षक

मुरगुड पोलीस स्टेशन.

लिंगनूर येथील अष्टविनायक तरुण मंडळ, शिवछावा तरुण मंडळ, ओम गणेश तरुण मंडळ, संकल्प गणेश तरुण मंडळ, अयानक गणेश तरुण मंडळ, युवा शक्ती तरुण मंडळ व पंचशील तरूण मंडळ यांचा या निर्णयामध्ये समावेश आहे. 

‌स्थापने पासून आमच्या गणेशोत्सव मंडळाने दर वर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, बेटी बचाव; बेटी पढाव प्रबोधन, कीर्तन असे सामाजिक कार्यक्रम राबवले, पूढेही राबवू. पण सद्याच्या महामारीच्या काळात जमाव बंदी, संचारबंदी, शारीरिक अंतर पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून आमच्या मंडळांतील सदस्यांच्या सर्वानुमताने पोलीस उपनिरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीप्रतिष्ठा पणा न करता सामाजिक उपक्रम राबवून सार्वजनिक आरोग्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला

अमित पोवारअध्यक्ष

अष्टविनायक तरुण मंडळ.

लिंगनूर (का.) च्या इतिहासात पहिल्यांदाच गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साजरा केला जाणार नाही. पोलिस प्रशासनाच्या आवहानाला प्रतिसाद देत आणि कोरोनाचे संकट लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय