Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणवेल्फेयर सोसायटी फॉर इन्स्टिट्यूट चिर्ल्डन संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

वेल्फेयर सोसायटी फॉर इन्स्टिट्यूट चिर्ल्डन संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

मुरबाड (प्रतिनीधी) : वेल्फेयर सोसायटी फॉर इन्स्टिट्यूट चिर्ल्डन संस्थेच्या वतीने मढ ग्रामपंचायत येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत मढ यांनी वेल्फेयर सोसायटी फॉर इन्स्टिट्यूट चिर्ल्डन या बांद्रा मुंबई येथील ट्रस्ट संचलित सेट कॅथरीना सिएना स्कूल एकलहारे (ता. मुरबाड)यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची तात्काळ पुर्तता केली. ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांकडून ५५ कुटुंबांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

जीवनावश्यक किटमध्ये साखर, तूरडाळ, मुगडाळ, रवा, मीठ, तेल, पोहे, चहा पुडा, मसाला, हळदगरम मसाला, बटाटे आदी वस्तूंंचा समावेश आहे. बिरसा क्रांती दलाचे तुकाराम रडे यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.

यावेळी बिरसा क्रांती दल मुरबाड अध्यक्ष तुकाराम रडे, उपाध्यक्ष दिलीप शिद, सचिव मधुकर पादिर, महासचिव दिनेश नंदकर, संजय घुटे, रवींद्र आंबवणे,  तुकाराम वाघ, संध्याताई जंगले, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय