Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुणे येथे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुणे येथे निधन

:दि.१३-प्रतिभावंत गायिका,संगीत रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका व विदुषी म्हणून लौकिक असलेल्या
शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज पुण्यात पहाटे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. आज पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांचे वडील आबासाहेब तर आई इंदिराबाई अत्रे. लहानपणापासूनच प्रभा यांना संगीताची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रभा यांनी गुरुशिष्य परंपरेत संगीताचे शिक्षण घेतले. किराणा घराण्यातील सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. गायनासोबतच त्यांनी कथ्थक नृत्याचे सुद्धा प्रशिक्षणही घेतले होते.
संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.
काही वर्षं त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये कामही केलं. तर त्या मुंबईतील SNDT महिला विद्यापीठात प्राध्यापिका आणि नंतर संगीत विभागाच्या प्रमुख झाल्या.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे आज (शनिवारी दिनांक १३ जानेवारी २०२४) पहाटे ३.३०च्या सुमारास दु:खद निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. डॉ. प्रभा अत्रे यांची अमेरिकास्थित भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानुसार अंत्यदर्शनाची वेळ कळवण्यात येईल. असे प्रसाद भडसावळे (स्वरमयी गुरुकुल) यांनी कळवले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय