(गंगाखेड) : धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र भर जनजागृती व आंदोलन करणाऱ्या धनगर साम्राज्य सेनेने उत्तरप्रदेशात चंचूप्रवेश केलाय. सुलतानपूर जिल्हाध्यक्षपदी कांशीराम पाल यांची नियुक्ती करण्यात आली.
धनगर साम्राज्य संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे विभाग प्रमुख श्रीकांत भुजाडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. भविष्यात ही संघटना संपूर्ण भारतभर पोहोचणार असल्याचा विश्वास विदर्भ प्रमुख श्रीकांत भुजाडे यांनी व्यक्त केला.
धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आशुतोषभाऊ शेंडगे, मराठवाडा संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, विदर्भ प्रदेशाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भुजाडे यांच्याकडून ही नियुक्ती करण्यात आली.