तळोदा (प्रतिनिधी) : मोड येथे अवैध दारू जप्त करण्यात आली. सरपंचांंच्या सतर्कतेमुळे ही घटना समोर आली.
मोड गावाचे सरपंच जयसिंग माळी सायंकाळी दुध घालण्यासाठी डेअरीवर गेले असताना चार जण भरधाव वेगाने गावाच्या दिशाने येत होत्या. यावेळी सरपंचांनी लांबून हात करून थांबण्याचा इशारा केला. गाडीवर पाढऱ्या गोण्यांमध्ये काही तरी असल्यामुळे सरपंचांंनी काय आहे म्हणून विचारणा केली असता गोण्या तिथेच टाकून पळ काढला. गोण्यांमधून दारुसारखा उग्र वास येत होतो.
मोड येथे मागील चार वर्षापासून दारूबंदी आहे. काही लोक दारू चोरून विक्री करीत आहेत अशी माहीती मिळाली होती. आज दारू वाहतूक करणारे निदर्शनास आल्यामुळे हा ही घटना उघडकीस आली
जयसिंग माळी
सरपंच, मोड
गोण्यांमध्ये दारू असल्याचे समजताच सरपंच माळी यांनी दारूबंदी समितीचे अध्यक्ष नवल माळी, उपाध्यक्ष सुभाष ठाकरे, राणाजी भिलावे, रोहीदास महाराज, कायसिंग वळवी, रावा वळवी, सुदाम ठाकरे यांना बोलवून घेतले.व हि दारू बोरद औट पोस्ट येथील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे, एकनाथ ठाकरे, रविंद्र सोनवणे यांचे स्वाधीन केली.
मोड गावात गेली चार वर्षे दारूबंदी आहे. चोरून लपून दारु विक्री होऊ दिली जात नाही, मोड गावाने एकमताने दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे. गावमध्ये यामुळे तंटे कमी होण्यास मदत होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.