Friday, November 8, 2024
Homeजुन्नरमहाराष्ट्रातील "या" आदिवासी गावांत आढळतात खणखण वाजणारे दगड

महाराष्ट्रातील “या” आदिवासी गावांत आढळतात खणखण वाजणारे दगड

जुन्नर : निसर्गसंपन्न जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे परिसरात रांजण बुरुज तसेच डामसेवाडी परिसरात गारमाळ येथे घंटेसारखा खणखण आवाज येणाऱ्या काही शिळा आढळून आल्या असल्याचे पर्यटक मार्गदर्शक पुताजी उर्फ बाळा डामसे यांनी सांगितले. अशाप्रकारचे दगड “आंबे” या गावात देखील पहावयास मिळतात.

येथील माळरानावर दगडमाळ आहे. या माळरानात अनेक दगड इतस्ततः विखुरले आहेत. या अनेक दगडात असलेले काही दगड मात्र अदभुत आवाजाचे असून येथील काही दगडांवर दुसऱ्या कोणत्याही दगड अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास घंटे सारखा मंजुळ आवाज येतो.

रांजण बुरुजा जवळील एक दगड व डामसेवाडी परिसरात तीन ते चार दगड आपल्याला आढळून आले ज्यांच्यातून खणखण असा आवाज येतो या दगडांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असावे यामुळे हा आवाज येत असल्याचे डामसे यांनी सांगितले.

पर्यटकांनी या वाजणाऱ्या दगडांना भेट देण्यासाठी अवश्य यावे. मात्र या दगडांची नासधूस करू नये. वन विभागाने या दगडांचे संवर्धन करावे. विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कारिक असणाऱ्या ह्या दगडांवर संशोधन करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणचे दगड हे कदाचित उल्कापात, भूगर्भातील खनिजे किंवा लाव्हारसापासून बनलेले असावेत. तसेच हे दगड पोकळ देखील असू शकतील. एखादया धातूच्या भांड्यावर दगड अपटल्यावर जसा आवाज येतो तसा हा आवाज आहे. या दगडांवर त्यांचे मूळ स्वरूप न बदलता योग्य प्रकारे संशोधन होण्याची गरज आहे. तेव्हाच नक्की कळू शकेल की या दगडांमध्ये नक्की काय आहे. 

HSL

संबंधित लेख

लोकप्रिय