Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकोण आहेत शेख नवाब अल अहमद? भारतामध्ये आज पाळला जाणार राष्ट्रीय दुखवटा...

कोण आहेत शेख नवाब अल अहमद? भारतामध्ये आज पाळला जाणार राष्ट्रीय दुखवटा कारण..

कुवेत राज्याचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे (Sheikh Nawaf Al-Ahmad Al-Jaber Al-Sabah) 16 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत शोक आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या सन्मानार्थ, भारत सरकारने 17 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो, तो अर्ध्यापर्यंत खाली घेण्यात येणार आहे आणि त्या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत.

कुवैत शेख नवाफ यांचे 16 डिसेंबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आपला सावत्र भाऊ शेख सबाह अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या मृत्यूनंतर शेख नवाफ यांनी सप्टेंबर 2020 मध्ये सत्ता हाती घेतली होती. शेख नवाफ यांच्या निधनानंतर त्यांचे 83 वर्षीय सावत्र भाऊ शेख मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह हे कुवेतचे नवे शासक असतील.

संबंधित लेख

लोकप्रिय