इंडस इन्स्टिट्यूटमध्ये विजय दिन साजरा
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:वाकड येथील आयआयइबीएम संस्था संचलित इंडस बिझनेस स्कूलमध्ये विजय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी १९७१ च्या विजयी युद्धातील सैनिक परम विशीष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल दालीप भारद्वाज,कर्नल नियती नायक,कर्नल विनोद मारवाह,ब्रिगेडिअर दीपक बजाज,ब्रिगेडियर प्रमथेश रैना,कर्नल सुधीर भटनागर,ब्रिगेडिअर भवानीसिंग शेखावत,कर्नल गुरिंदरसिंग ग्रेवाल,डॉ.जयसिंग मारवाह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ फॉलन सोल्जर बॅटल क्रॉस (शहिद जवानांचे प्रतीक) चे अनावरण करण्यात आले.
यावेळी ले.जन.भारद्वाज म्हणाले कि,आयुष्यात कोणतेही कार्य करा,मात्र सर्वप्रथम देश अशी भावना मनात बाळगा.देशातील प्रत्येक नागरीकांनी स्वयंशिस्तीला सर्वाधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.
आयआयईबीएमचे अध्यक्ष कर्नल विनोद मारवाह म्हणाले कि,भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत केलेल्या युध्दात आम्ही विजय मिळवला. पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले. तेव्हा बांग्लादेश हा नवीन देश उदयास आला.या युध्दातील सर्व जवान एकत्रित येवून आम्ही विजय दिन साजरा करीत आहे.युध्दाच्या वेळी आम्ही अंदाजे १८/१९ वयाचे असेल.आजही आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात राष्ट्रहित सर्वप्रथम मानतो.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आय.आय.ई.बी.एमच्या अधिष्ठाता डॉ. पूनम निकम,प्राचार्या प्रा.नम्रता जियानी,सह अधिष्ठाता डॉ विशाल भोळे,कर्नल रवींद्र कुमार,बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारीयांनी विशेष परिश्रम घेतले.