Wednesday, February 12, 2025

PCMC : पोदारच्या शाळांना “बेस्ट चेन ऑफ स्कूल्स” चा पुरस्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : एथोस एज्युसोल्युशन्स च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक परिषदेत पोदार ग्रूप ऑफ स्कूलला “बेस्ट चेन ऑफ स्कूल्सचा” पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोदार समूहाचे पुणे विभागाचे महाव्यवस्थापक डीएसजे फ्रॅंकलिन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटीक्स च्या प्रणाली साठी वाकडच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलला मिमांसा स्कूल ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला. प्राचार्य ऍग्नेल कार्व्हालो यांनी पुरस्कार स्वीकारला.

पोदार इंटरनॅशनल स्कूल- सारा सिटी चाकण (सीबीएसई) आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी यांना ‘जीवन कौशल्य कार्यक्रम उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी’ स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल चाकण, यांना ‘सर्वात प्रभावी शिक्षण पद्धती असलेली शाळा’ हा पुरस्कार प्राप्त झाला. पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल, बारामती यांनी ‘द स्कूल विथ मोस्ट इनोव्हेटिव्ह लर्निंग मेथड्स’ साठी पदक देवून गौरवण्यात आले.  

पोदार इंटरनॅशनल स्कूल CAIE ने डिजिटल साक्षरतेसाठी (पुणे विभाग) सर्वोत्कृष्ट CAIE अभ्यासक्रम असलेल्या शाळेचा पुरस्कार मिळाला. पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाघोलीला ‘द मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्कूल’ चा करंडक प्राप्त झाला. पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल, खेड यांना ‘प्रकल्प आधारित शिक्षणाच्या उत्कृष्ट अंमलबजावणी’ बद्दल पदक मिळाले.

पोदार शाळांचे मुख्याध्यापक स्मिता पॅटरसन, शहनाज कोत्तर, सिमरन कौर, अनघा घोलप, अर्चना कारंडे, तुषार कुलकर्णी, संजीव भारद्वाज, नीता कुमार आणि अॅग्नेल कार्व्हालो या कार्यक्रमाला उपस्थित होते.

फ्रॅंकलिन म्हणाले कि, हा आमच्या साठी अभिमानाचा क्षण आहे कारण 2005 मध्ये त्यांनी पिंपरी येथील पहिल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल, (ICSE) च्या रूपात लावलेल्या रोपट्याचे रुपांतर 17 शाखांमध्ये झाले. जिथे सुमारे 25000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्रातील विविध शाळांमधील 200 हून अधिक मुख्याध्यापक, उच्च शिक्षण प्रभावक, एडटेक शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोमैदास रंजन आणि नवीन राय यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या आवृत्तीची थीम NCF अंमलबजावणीतील शाळांसमोरील आव्हानांना विविध संभाव्यतेतून आणि उद्योग तज्ञ आणि एड-टेक कशी मदत करू शकतात या संदर्भात होती.

Mahaegs Maharashtra Recruitment

Related Articles

- Advertisement -

Latest Articles