Monday, December 23, 2024
Homeआरोग्यएकात्मता नगर मध्ये आम आदमी पार्टीचा ऑक्सी मित्र अभियान

एकात्मता नगर मध्ये आम आदमी पार्टीचा ऑक्सी मित्र अभियान

नागपूर : आम आदमी पार्टी ऑक्सी मित्र अभियाना अंतर्गत एकात्मता नगर जयताळा येथे स्लम संघटन समन्वयक सचिन लोणकर यांच्या नेतृत्वात ऑक्सीजन पातळी आणि टेंपरेचर चेक करण्यात आले. 

हे अभियान फिजिकल डिस्टेंसिंग च्या नियमांचे पालन करुन राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत जवळपास ७०० लोकांचे ऑक्सीजन पातळी तापासन्यत आली आहे. हे अभियान ०७ सप्टेंबर २०२० पासून स्लम एरीया मधे चालु आहे. लोकांना ऑक्सीजन पातळी चे महत्व व कोरोना महामारी मध्ये कोणती सवाधगिरी घ्यायची या बद्दल ही सांगण्यात येते. 

व्यतिरिक्त घरकाम करणाऱ्या महिला, विधवा महिलां ज्यांना लहान मुल आहेत, ज्या घरी माणसाला लकवा किंवा अपंगत्व आले आहे, अश्या अत्यंत गरजू लोकांना धान्याचे कीट आपचे सचिन लोणकर यांच्या कडून वितरीत करण्यात येत आहे. 

या अभियानात बुल्लु बेहराजी, देवेंद्र परिहार, प्रशांत पाटील, मुकेश भलावी, भुषण इंगळे, आणि इतर कार्यकर्ते व स्थानिक नागरिक सहभागी आहेत. हे अभियान संपूर्ण नागपुर शहरात राबविण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय