पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ दसरा दिवशी रोजी नागपूर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली. तेंव्हा पासून दस-या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर पक्षाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला २५०० दिवे प्रज्वलित करून ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजारो दिप प्रज्वलित करीत उजाला केला. २५०० लखलखत्या पण त्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर उजाळून निघाला. कार्यक्रमाचे आयोजन रिपाइं पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी केले होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे शहराचे रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, महिपाल वाघमारे, श्याम गायकवाड सुगत धसाडे, संदीप धांडोरे मुकेश काळे, उमेश कांबळे, महादेव कांबळे, वसंत वाघमारे, मंगल रासगे, अक्षय गायकवाड, बाळासाहेब पानसरे, अशिष आल्हाट, निलेश गायकवाड, रोहित कांबळे, प्रीतम ढसाळ, संग्राम घंगाळे, तुकाराम अष्टगे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.