Friday, December 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलचा गाझामधील चर्चवर हल्ल्यात 18 ठार

इस्रायलचा गाझामधील चर्चवर हल्ल्यात 18 ठार

गाझा : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 15 व्या दिवशी पण सुरू आहे. गाझावर सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. यादरम्यान इस्रायलने गाझामधील सर्वात जुने ग्रीक ऑर्थोडॉक्‍स सेंट पॉर्फायरियस चर्चवर रॉकेट हल्ला केल्यामुळे 18 पॅलेस्टाईन शरणार्थी ठार झाले आहेत.

गाझा मधील हॉस्पिटल आता उध्वस्त झाली आहेत. लोक शाळा, प्रार्थनास्थळांचा आश्रय घेत आहेत. गाझा शहरात एक हजाराच्या आसपास ऑर्थोडक्स ग्रीक ख्रिश्चन राहतात, त्यांनी या चर्च मध्ये महिला मुलांना आश्रय दिला होता. या रॉकेट हल्ल्यात मुले महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय