Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आळंदीत विसर्जनास ढोल – ताशांचा दणदणाट; गणेश भक्तीमय जल्लोष

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील गणेश विसर्जन मिरवणुकांचे खास आकर्षण ठरला तो धर्मराज मित्र मंडळाचे केरळ सांस्कृतिक नृत्य, हरिनामाचा गजर, ढोल-ताशाचा दणदणाटात भक्तीमय जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यासाठी गणेश भक्तांनी आळंदी नगरपरिषद आणि श्री आळंदी धाम सेवा समिती, आळंदी शहर शिवसेना यांनी विकसित केलेल्या कृत्रिम सहा केंद्रात गणेश विसर्जन कुंडात ठिक ठिकाणी मोठी गर्दी केली. The drumming of immersion in Alandi – the clatter of clocks; Ganesha Devotional Jubilation

---Advertisement---

आळंदी नगरपरिषदेने यावर्षीही इंद्रायणी नदी घाट श्रींचे गणेश विसर्जन करण्यास पूर्ण पणे बंद केला होता. इंद्रायणी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी दक्षता उपाय योजनेचा भाग म्हंणून नदी घाटाचे दुतर्फ़ा मूर्ती विसर्जन केंद्र उभारल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. नदी घाटावर गणेश भक्तांनी नगरपरिषदेचे आवाहनाला प्रतिसाद देत हजारो मूर्ती दान करीत आळंदीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास सहकार्य केल्याबद्दल आळंदी नगरपरिषद प्रशासनाने आळंदी पोलीस, वाहतूक पोलीस, विविध सेवाभावी संस्थांसह गणेश भक्त आणि नागरिकांचे श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी आभार मानले.

आळंदी शहर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी ६ ठिकाणी केलेल्या मूर्ती दान स्वीकार केंद्रास प्रतिसाद देत आरती नंतर प्रतीकात्मक पाण्याचे मोठ्या हौद्यात श्रींचे विसर्जन करीत प्रशासनांकडे मूर्ती दान केल्या. यासाठी आळंदी नगरपरिषदेने मूर्ती दान केंद्र उभारली होती. भाविकांकडून गणेश मूर्ती दान घेत मागील वर्षीचा उच्चांक मोडत आणखी वाढविला. यावर्षी हजारो गणेश मूर्ती दान घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.  

---Advertisement---

आळंदीत पारंपरिक ढोल-ताशा आणि शिस्तबद्ध वारकरी शिक्षण संस्थेतील साधकांचे लक्षवेधी वेशभूषेत हरिनाम गजरात वाजत गाजत दिंडी मिरवणुका आणि गुलाल पुष्प उधळण तसेच भंडाराची मुक्त उधळण करीत श्रीना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तिमय भावपूर्ण उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी दिवस भर वरुणराजाचे कोसळणे सुरु होते. पावसात भिजत श्रींचे मिरवणूक आणि गणेश विसर्जन होत राहिले.  

आकर्षक सजविलेले विविध रथातून श्रींचे लक्षवेधी सजलेली मूर्ती, विद्युत रोषणाई आणि मार्गावरील जल्लोष यामुळे मिरवणुकीस मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी राहिला. दुतर्फा भाविक, नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करीत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी जय गणेश आणि न्यू गणेश प्रतिष्ठानने समाज प्रबोधन नाटिका सादर करीत मिरवणुकीत रंगत आणली. धर्मराज मित्र मंडळाने पारंपरिक केरळ नृत्य लक्षवेधी पद्धतीने सादर करीत मिरवणुकीत आळंदीकरांची दाद मिळवली.    

पुढील वर्षी लवकर या असा संदेश देत सामाजिक जनजागृतीचे देखावे सादरीकरण करीत गणेश मंडळांनी लक्ष वेधले. बाप्पाला निरोप देण्यासाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, दिघी आळंदी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी आळंदी शहरात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिश्रम पूर्वक गणेशोत्सवात नियोजन केले. 

यावर्षीचे उत्सवात आळंदी नगरपरिषद आरोग्य सेवा, आळंदीतील पोलीस मित्र यांची उपस्थिती आणि मदत लक्षणीय राहिली. आळंदी नगरपरिषद व पोलीस मित्र यांच्या तर्फे गणेश विसर्जना निमित्त इंद्रायणी नदी परिसर व इंद्रायणी घाटातील परिसरात तसेच वाय जंक्शन चौकात बंदोबस्त करण्यास परिश्रम पूर्वक कार्य करण्यात आले. आळंदी नगरपरिषदे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, किरण कोल्हे, बाबासाहेब भंडारी, पोलीस मित्र वेल्फेअर असोशिएशन अध्यक्ष शिवाजी जाधव आणि सहकारी पोलीस मित्र, नागरिक, कार्यकर्ते यांनी नदी परिसरात जनजागृती करीत मूर्ती संकलन केंद्रावर श्री आळंदी धाम सेवा समितीसह श्रींचे मूर्ती स्वीकारल्या. 

विसर्जना नंतर श्रींचे मूर्ती तात्काळ आळंदी शहर शिवसेना, श्री आळंदी धाम सेवा समिती सेवक, आळंदी नगरपरिषद कर्मचारी, स्वयंसेवकां मार्फत आळंदी नगरपरिषदेने दान म्हणून भक्तां कडून गणेश मूर्ती स्वीकारल्या. यावर्षी ही या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकर व्हावे, याकरिता आळंदी पोलिस ठाण्याचे वतीने नियोजन करून मंडळ पदाधिकारी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी वरिष्ठांचे वेळोवेळी केलेल्या सूचना प्रमाणे पंचक्रोशीत नियोजन केले. यासाठी पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी मंडळाचे पदाधिकारी यांचेशी सुसंवाद ठेवला. यामुळे आळंदीतील प्रथाचे पालन करीत इंद्रायणी नदी लगतच्या केंद्रावर श्रीची आरती नंतर श्रीचे विसर्जन गणेश मूर्ती दान करीत झाले. भाविकांनी निर्माल्य नदीत न देता निर्माल्य कुंडात तसेच सेवकांकडे देत नदी प्रदूषण रोखण्यास गणेश भक्तांनी देखील सहकार्य केले. यासाठी सर्वतोपरी मदत आळंदी नगरपरिषद आरोग्य सेवेने केली.

विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे होणाऱ्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सवात स्वीकारले. या उपक्रमाचे आळंदीत स्वागत करण्यात आले. आळंदी परिसरातील विसर्जन मिरवणूकांचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्यासाठी पोलिस मित्र, नागरिक, कार्यकर्ते यांनी मदत केली. 

गणेशभक्तांसह आळंदीकरांचे आभार – मुख्याधिकारी केंद्रे 

आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास नगरपरिषदेने यावर्षीही गणेश मूर्ती दान उपक्रम राबविला. यासाठी जनजागृती केली. नगरपरिषदेने केलेले आवाहन यास सार्वजनिक गणेश मंडळे आणि पंचक्रोशीतील नागरिक यांनी प्रतिसाद दिला. यावर्षी हजारो श्रींचे मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या. यामुळे या लोकाभिमुख उपक्रमास आळंदीकर नागरिकांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याने नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सर्वांचे आभार मानले. यावर्षी मूर्तीदान आणि निर्माल्य संकलन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला. निर्माल्यादी वस्तू इंद्रायणी नदी घाटावर घंटा गाडीतून जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

विसर्जन मिरवणूक उत्साही शांततेत झाली. वाहतूक पोलीस व आळंदी, दिघी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरानं आळंदीत विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. लक्षवेधी रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. 

विविध मंडळांनी उत्साहात सामाजिक उपक्रम

विविध मंडळांनी उत्साहात सामाजिक उपक्रम राबवित धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा केला. मिरवणुकी दरम्यान गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाचे स्वागत व सत्कार ठिकठिकाणी करण्यात आले. प्रदक्षिणा मार्गावर रस्त्याचे दुतर्फा नागरिक, भाविकांनी उभे राहून मिरवणुकीस गर्दी केली. गेली दहा दिवस सेवा करणाऱ्या आळंदी नगरपरिषदेच्या कर्मचारी व आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस आणि सामाजिक काम करणाऱ्या सेवकांचे मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने आळंदी नगरपरिषदेच्या सूचना प्रमाणे इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या आवाहना प्रमाणे मंडळाने गणपतीचे विसर्जन फुलांनी सजवलेल्या हौदात केले. मंडळाच्या सर्व सभासदांनी गेली दहा दिवस मेहनत घेऊन गणेशोत्सव साजरा केला. यावर्षी ही गणेश विसर्जन शांततेत झाले. गणपतींचे विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता दिमाखात आनंद सोहळा पार पडला.

---Advertisement---

जय गणेश प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान,अखिल भाजी मंडई मंडळ, हनुमान मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, श्री दत्त नगर प्रतिष्ठान, न्यू दत्तनगर मित्र मंडळ, दत्तनगर प्रतिष्ठान, पद्मावती मित्र मंडळ, नवशिवशक्ती मित्र मंडळ, राजे ग्रुप, रोकडोबा महाराज प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ, हर हर महादेव मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ यावर्षी भंडाराची मुक्त उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशाचा गजरात, हरीनाम जय घोषात विसर्जन श्रींचे करण्यात आले. गणेशोत्सव या आनंदोत्सवाची सांगता श्रीचे विसर्जनानंतर महाप्रसाद वाटपाने झाली. 

आळंदीत शांतता सुव्यवस्थेसाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, सतीश नंदुररकर, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी मूर्ती दान उपक्रमास गती दिली. आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, श्री आळंदी धाम सेवा समिती पदाधिकारी साईनाथ ताम्हाणे, नितीन ननवरे, सारंग जोशी, हिरामण तळेकर, मोहन तळेकर, निलेश आढळराव पाटील, अशोक ननवरे, सचिन शिंदे, रायबा साबळे, अविनाश राळे, परसराम धनवटे, गोविंद पाटील, संकेत वाघमारे, ज्ञानेश्वर घुंडरे, दिनकर तांबे, महादेव पाखरे यांचेसह एमआयटी महाविद्यालयीन युवक- युवती, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी श्री गणेश मूर्ती संकलनात सहभागी झाले होते.

आपत्ती निवारण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांनी सेवा रुजू केली. सद्भावना ग्रुप व राजे ग्रुप गणेश मंडळाने ढोल ताश्यांच्या निनादात गणेश विसर्जनाची जल्लोषात मिरवणूक झाली. जय गणेश प्रतिष्ठानने सादर केलेल्या लक्षवेधी देखाव्यात जनजागृती करण्यात आली. एकलव्य प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, एकत्व प्रतिष्ठान, न्यु. दत्तनगर ग्रुप, धर्मराज ग्रुप, श्री.दत्तनगर प्रतिष्ठान, सुवर्णयुग मित्र मंडळ, गर्जना पसायदान मित्र मंडळ आदी मंडळांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. मिरवणुकी चित्र रथ लक्षवेधी ठरले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles