Thursday, December 26, 2024
Homeराज्यसंतापजनक : कबुतर चोरल्याच्या संशयावरून तीन दलित मुलांना झाडाला उलटं टांगून अमानुष...

संतापजनक : कबुतर चोरल्याच्या संशयावरून तीन दलित मुलांना झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मनिपुरची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबुतरं, शेळी चोरल्याच्या संशयावरून गावातील जातीवादी समाजकंटांनी तीन दलित मुलांना झाडाला उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून तनावाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शनिवारी 3 बौद्ध तरुणांनी कबुतरं, शेळी चोरल्याच्या संशयावरून गावातील धनदांडग्या लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. कृरतेचा कळस म्हणजे त्यातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर लघवी केली, त्याला थुंकी चाटायला लावली, कपडे काढून झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, व बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी देखील आरोपींनी पीडितांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाची फोनवरून विचारपूस करून त्याला धीर दिला. त्यावेळी पीडित तरुणांच्या आजीशी ही त्यांनी संवाद साधला व मदतीचे आश्वासन दिले. या सोबतच ते स्वतः १ सप्टेंबर रोजी पीडित परिवाराच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. तीन दलित मुलांना ‘शिक्षा’ देण्याचा अधिकार आपल्याला आहे ही मानसिकता इथल्या जातीय व्यवस्थेनेच जोपासली आहे. इतर कोणाला कबुतर चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष मारहाण झाली असती ?? निश्चितच नाही”! असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय