Saturday, December 28, 2024
Homeग्रामीणखासदार हिना गावीत यांच्या विरोधात बिरसा क्रांती दलाचे निषेध आंदोलन

खासदार हिना गावीत यांच्या विरोधात बिरसा क्रांती दलाचे निषेध आंदोलन

रत्नागिरी : खासदार हिना गावीत यांच्या विरोधात नंदुरबार येथील निवासस्थाना समोर १६ मे रोजी बिरसा क्रांती दल निषेध आंदोलन करणार आहे. या संबंधीचे निवेदन नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे व निवेदनाची प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस अधिक्षक नंदूरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना पाठविली आहे.  

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांच्यावर विनाकारण वारंवार खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्या खासदार हिना गावीत यांच्या घरासमोर जाहीर निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष व कोकण विभाग प्रमुख सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

निवेदनात म्हटले म्हटले आहे की, नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या विरोधात खोटे आरोप करीत विनाकारण बदनामी करणारे रोज नवीन नवीन व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकत आहेत. एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला सुडबुद्धीने वारंवार वेठीस धरून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हिना गावीत बदनाम करीत आहेत. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम रित्या चालू असताना जिल्हाधिकारी नंदुरबार व इतर अधिका-यांवर बिनबुडाचे आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून व वृत्तपत्रात खोट्या बातम्या देऊन नंदुरबार जिल्ह्याचे वातावरण खराब करीत आहेत. “नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर फिरत असून देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

अभिनेता अजय देवगण, अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव सिताराम कुंटे, हिंदी न्यूज, मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने सुद्धा  कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद वातावरणात  हिना गावीत या राजेंद्र भारूड यांच्यावर खोटे आरोप करून जिल्हाधिकारी यांच्या मनाचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी यांना कामात साथ द्यायचे सोडून त्यांची पाये खेचण्याचे काम करत आहे. राजेंद्र भारूड यांच्या सरकारी कामात वारंवार  अडचणी निर्माण करत आहेत म्हणून आम्ही हिना गावीत खासदार यांचा जाहीर निषेध करतो. एका लोकप्रतिनिधींनी कोरोना सारख्या या संकटकाळी जिल्हा प्रशासनाला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत करायचे सोडून नंदुरबार कलेक्टर यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम खासदार हिना गावीत करीत आहेत. ही मोठी दुर्दैवाची व लाजीरवाणी बाब असल्याचे सुशिलकुमार पावरा यांनी म्हटले आहे.

नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबारसाठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु खासदार हिना गावीत ह्या कलेक्टर राजेंद्र भारूड यांचे कौतूक करायचे सोडून समाजमाध्यमात बदनामी करत आहेत. राजेंद्र भारूड यांची ऑक्सीजन प्लांटबाबत थापेबाजी, ऑक्सीजन प्लांटबाबत खोट्या बातम्या व खोटी माहिती, नंदुरबार मध्ये ऑक्सीजनचा तुटवडा आहे वगैरे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत.  याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो असेही म्हटले आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्यावर आरोप करून हिना गावीत अत्यंत चूकीचे काम करत आहे. खरं पाहिलं तर राजेंद्र भारूड हे स्वत: डाॅक्टर असून आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासी जनतेच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत. अशा वेळी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला साथ दिली पाहिजे, मनोबल वाढवले पाहिजे.

या संकटकाळी रूग्णांसाठी हॉस्पिटलची, बेडची, रेमडीसीवरची, औषधांची, ऑक्सीजनची सोय करणे अत्यंत आवश्यक आहे. ही वेळ निवडूकीची नाही, राजकारण करण्याची किंवा आरोप प्रत्योरोप करण्याची नाही. तरी राजेंद्र भारूड यांच्या वर बिनबुडाचे आरोप करत हिना गावीत ह्या राजकारण करत आहेत. यामुळे रूग्णांकडे दुर्लक्ष होऊन तसेच रूग्णांची गैरसोय होऊन कोरोना मृत्यूदर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून कोरोना कामात प्रशासनाला निष्क्रीय बनविण्यासाठी हिना गावीत काम करत आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब असून खासदार पदाला अशोभनीय कृत्य सध्या हिना गावीत करीत आहेत. म्हणूनच १६ मे २०२१ रोजी दुपारी २ वाजता त्यांचा महाराष्ट्र भर विविध जिल्हा व तालुका व घराघरांतून स्वतःच्या घरासमोर उभे राहून जाहीर निषेध करणार आहोत व बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्ह्यासह विविध भागातील कार्यकर्ते एकत्र येऊन हिना गावीत यांच्या नंदुरबार येथील घरासमोर उभे राहून जाहीर निषेध नोंदविणारे आंदोलन करणार आहोत. असे सुशिलकुमार पावरा निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय