Friday, December 27, 2024
Homeराज्यशिरूरमधून डॉ.अमोल कोल्हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिरुरचे उमेदवार असतील यावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बैठकीत शरद पवार यांनी सर्वांसमोरच अमोल कोल्हे यांना तुम्ही पुन्हा लढणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनीही हो असं उत्तर दिलं.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून देखील शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. तसेच कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय