Friday, December 27, 2024
Homeविशेष लेखलेख : कोरोना लॉकडाऊन

लेख : कोरोना लॉकडाऊन

टाळेबंदी(लॉकडाऊन) आपल्या या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने लाखो लोकांचे बळी घेतलेत, लोकांमध्ये खूपच दुरावे निर्माण केलेत आणि गावोगावी या संपुर्ण भारतात प्रवेश घेतला. लॉकडाऊनचा प्रादुर्भाव वाढतच राहिला, अजून सुद्धा चालूच आहे. या कोरोना रूपी महामारीने आपल्या या देशात खूपच धूमाकुळ घातला, कोरोनामुळे लॉकडाऊन इतके वाढले की कोणतेच नातेवाईक आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाही. कोविड 19 हा रोज चिन मधून आपल्या भारतात आला. या महामारीमुळे लोक मानसिकतेचे शिकार झाले.कोरोनामुळे नाही तर, त्या कोरोनाचा विचार करूनच लोकांवर मानसिकतेचा परिणाम झाला. आणि खूप लोक या महामारीची काळजी करून मृत्यृमुखी पडले. महामारीमुळे लोकांमध्ये खूपच दुरावे आले. कोणी कोणाच्या भेटीला जात नाही, कुठे येणे जाणे सर्वच अजून बंद आहे.

वाहनावर पण या लॉकडाऊनचा परिणाम खूपच होत आहे. कोणतीच वाहने सुरू नाही, आणि या लॉकडाऊन मुळे मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम झाला. विद्यार्थ्यांचे शिकण्याचे मार्ग थांबले, सर्वसामान्य आणि गरीबांवर वाईट परिणाम या लॉकडाऊन मुळे झाला.

या कोरोनारूपी महामारीला रोखण्यासाठी खूप डॉक्टर नर्स आणि पोलिसांची खूप मदत मिळाली. त्यांचे जे कर्तव्य होते ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका उत्कृष्ट रीत्या पार पाडत आहे, मला गर्व आहे अश्या पोलिसांचा जे या महामारी शी सामना करीत आहे. कितीतरी लोकांचे या लॉकडाऊन मुळे हाल बेहाल झाले. तसे तर हा महामारीचा रोग आपल्या देशात आला त्याचा सामना करणे आपली जबाबदारीच आहे. हे लॉकडाऊन बंद होण्यासाठी जे काय मदत हवी आहे ते मदत करणे आपले कर्तव्यच आहे, सरकार आणि प्रशासन हे आपली जबाबदारी योग्य रीत्या पार पाडत आहे. प्रत्येक गावात ज्या सुविधा पाहीजे त्या मिळत आहे, सॅनिटायझर, मास्क, योग्य वेळी त्याचा वापर करणे, आणि बाहेरून आले किंवा कोणत्याही वस्तूला हात लागताच हात स्वच्छ धुणे, आणि नियमितपणे गरम पाण्याचा वापर करणे, खोकला आला तर लगेच स्वतःची(सेप्रेट रूमाल) असणे आवश्यक आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये, याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. कारण या लॉकडाऊन मुळे काही चांगले तर काही वाईट परिणाम झाले.

लॉकडाऊन गावोगाव

प्रत्येक गावी झाले सुरू,

मानसिकतेच्या रोगावर

सर्वजण मिळून मात करू..!

या लॉकडाऊन मुळे प्रत्येक जण आपापल्या घरात राहतात, जो व्यक्ती दिवस भर काम करत राहायचा. ज्या व्यक्तीला आपल्या परिवारासोबत दोन गोष्टी सांगायला सुद्धा वेळ नव्हता. तो व्यक्ती मात्र या लॉकडाऊन मध्ये घरी बसुन परिवारासोबत (फ्री) राहून आपल्या मनातले विचार, भावना व्यक्त करू शकत आहे, आणि खास म्हणजे ईलेक्ट्रीकल डीजीटल, इंटरनेट वापरामुळे घरी मनोरंजन होऊ शकत आहे. टी व्ही, मोबाईल मुळे एक नविन मार्ग शिक्षणाकरीता सापडला, तो म्हणजे मोबाईल या वस्तूला ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सरकारने काढला. अनेक काम मोबाईल मुळे घरबसल्या होऊ शकत आहे. हे लॉकडाऊन बंद होण्यासाठी खूप प्रयत्न चालूच आहे, तरी सुद्धा विद्यार्थांचे शिक्षण पूर्ण होवो अशी इच्छा सर्वाची आहे,तरी बाहेर पडू नका. घरीच रहा, एवढ जरी आपण केलं तर आपण माणुसकी जपण्यात योग्य ठरू. आणि हे लॉकडाऊन लवकरच बंद होईल यात आपली मदत असो,आणि ही महामारी लॉकडाऊन(टाळेबंदी)लवकरात लवकर नष्ट होवो.

साथ सर्वांची…सुटका महामारीची…!

भारतामध्ये आली

कोरोनाची महामारी,

लॉकडाऊन मुळे सर्वाना

 खूप पडत आहे भारी..!

●● दिपाली निरंजन मारोटकर,

      पळसखेड (अमरावती)


संबंधित लेख

लोकप्रिय