Thursday, December 26, 2024
Homeजिल्हापुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं, पुढील 4 दिवस पावसाचे

पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं, पुढील 4 दिवस पावसाचे

पुणे, 29 मे : राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने रायगड, रत्नागिरी, पुणे, वाशिम जिल्ह्याला चांगलेच झोडपले. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा यामुळे वरून राजाचे रौद्र रूप पाहायला मिळालं.

पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज

राज्यातील विविध भागात पुढील 30 मे ते 2 जून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय