Friday, December 27, 2024
Homeजुन्नरशाहू महाराजांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी –डॉ.लक्ष्मण घोलप

शाहू महाराजांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी –डॉ.लक्ष्मण घोलप

जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे (बांगरवाडी) येथील शैक्षणिक संकुलात छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे फुल व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, एमबीएचे प्राचार्य डॉ.शिरीष गवळी, डॉ.महेश भास्कर, समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर, रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले, प्रा.दिनेश जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, परीक्षा अधिकारी प्रा.सचिन शेळके, नॅक समन्वयक डॉ. संदिप नेहे, सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांबद्दल माहिती देताना बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की, शाहू महाराजांचे विचार सर्वांना प्रेरणादायी असून त्याचा जीवनात उपयोग करून उत्कर्ष साधावा. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. 

पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य त्यांनी केले, असेही डॉ. घोलप म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा.गणेश नवले यांनी तर आभार प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय